Tuesday, May 1, 2012

Story

चौथा call होता आता हा. आणि हि रिंग तर साली अजून संपतच नव्हती, प्रत्येक सेकंद हा नुसता एका भयाण क्षणासारखा, स्वतःच अस्तित्व अगदी ठामपणे गाजवणारा आणि मगच पुढे जाणारा.... आधीच मनाचा निश्चय डळमळीत ,त्यात हे एकावर एक येणारे नुसते calls. नक्कीच पोचली असेल एव्हाना ती तिकडे. नेहमीसारखी  स्वताच्याच जगात, सराईतासारखी नुसती एक नजर फिरवली असेल - तिच्या भाषेत म्हणायचं तर सगळ्या 'crowd' वरून, आणि मग कुठेच दिसत नाही म्हणून एकदा goggle काढून घड्याळ  पाहिलं असेल, एकदा सुस्कारा टाकून मान हलवली असेल..... आणि मग हा फोन चा शेवटचा पर्याय... 
त्यान ring silent केली. अगदी डोळ्यासमोर घडत असलेल्या गोष्टीकडे सर्रास कानाडोळा करायला सोप जाव
म्हणून बनवलेली सोय आहे हे ring silent करता येण्याच feature म्हणजे. तिचच वाक्य. असच कधीतरी तावातावाने म्हटलेल. "मी ज्या गोष्टी चिडून बोलते त्याच लक्षात राहतात तुझ्या!" हे वाक्य सुद्धा कधीतरी चिडूनच म्हटलेल असल्याने त्याच्या लक्षात राहिलंय! तो स्वतशीच हसला.  कदाचित अशा हसण्यालाच 'कुत्चीत' हास्य म्हणत असावेत.

"25 minutes उशीर!??" उंचावलेल्या भुवया, कपाळावर आठ्या, रोखलेले डोळे आणि ओठांचा चंबू. अजिबात बदललेली नाहीये पोरगी. 
"Hhhmm... हो. Sorry."
"एवढ जीवावर येतंय तर म्हणू नकोस Sorry."
"ते तिकडच table आहे - बसू तिकडे" 
"आणि इतका अचरटा सारखा उशीर का केलास? मी तुझी वाट  पहात  मुर्खासारखी थांबते का नाही ते बघायच होत का?"
"हो" 
"चौथ्या वाक्यातच सरळ उत्तर आणि मुद्द्याला हात? वा वा, प्रगती आहे! 5 minutes ची प्रस्तावना आणि 10 minutes च रडगाणं याला तू चाट दिलीस हे एक बर केलास बुवा."

तो काहीच बोलला नाही. तिला चिडचिड करण्यासाठी तिची space लागते हे त्याला अनुभवांती ठाऊक होत. त्यान 2 चहा मागवले आणि हात table वर ठेवून तिच्याकडे पाहू लागला. ती अजूनही फुरफुरत होती. "useless" वगैरे तत्सम शब्द त्याच्या कानी पडले. college मध्ये असताना आणि नंतर सुद्धा त्याला अनेकांनी "तुमच्या दोघांच काही लफड वगैरे आहे का" अस अनेकदा विचारल असेल.   अशा प्रश्नाचं उत्तर देण्यानी कधीच काही हशील होत नाही. विचारणाऱ्या माणसाच मत तुमच्या उत्तरांनी बदलणार तर नसतच - उलट ते अजून धृढच होणार असत - तुम्ही काहीही म्हणा. पण खर सांगायच तर त्याला स्वतःलाच माहिती नव्हत. मैत्रीण? शत्रू? rival? confidant? He had always done his best work with her. त्यांची team unbeatable होती. ते वचावचा भांडायचे. तो तिच्यावर चिडायचा, ती त्याला शिव्या घालायची. तो तिला हाड-हूड करायचा. पण शेवटी काम पूर्ण व्हायच. एका basic courtesy च्या पुढे त्यांना एकमेकांबद्दल काहीच personal माहिती नव्हती. दोघांनीही कधी ती जाणून घ्यायचा प्रयत्न हि केला नव्हता. एक-दोन warm moments नक्कीच share केल्या असतील त्यांनी पण ते तेव्हढपुरतच. सगळे जण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाणार तेव्हा farewell party च्या शेवटी त्यांनी एकदा मिठी मारली होती. अगदी क्षण दोन क्षण ती मिठी सोडूच नये असा विचार त्याच्या मनात येऊन गेला असेल, कदाचित तिने ती मिठी सोडायला एक पाव सेकंद जास्त लावला असेल किंवा कदाचित हा सगळा त्याचा भास च असेल...
"ओ राजे आलाय चहा. घ्या. 6 वर्षांनी भेटतोय आपण. काही बोलणार आहात का नुसत थोबाडाकडे  पाहत बसायचं एकमेकांच्या?"
"काय म्हणतय वैवाहिक जीवन?"
"मस्त! 8 वर्ष झालीत लग्नाला. पोराबाळांची झंझंट नाही. दोघ जण पैसे कमवतोय. We enjoy our work and enjoy each others' company."
"So you are happy?"
"I don't see any reason why I should say no."
"Hhmm... True."
"अरे निदान खोट खोट तरी I am happy for you अस म्हण!"
"मी तस म्हणत नाहीये हे एक indication नाही का?"

तिनी चहाचा cup खाली ठेवला. एक दुखावल गेल्याची भावनेची झालर तिच्या डोळ्यांवर आल्यासारख वाटल त्याला. उगाचच एक आसुरी आनंदाची लहर त्याच्या मस्तकात गेली. आणि लगेचच दुसर्याच क्षणी ती  विरून त्याला  किळस आली स्वताची. काय करतोय तो? तिला दुखावतोय? मुद्दामहून? कशासाठी? कारण राग आलाय त्याला तिचा. पण तो राग नक्की कशाचा आहे? असा काय आहे जे त्याच्याकडे नाहीये? पण तरी काहीतरी खुपतंय. ठसठसतय. झोम्बतय. 
"काय झाल? मला माहितीये कि friends, नवरा-बायको यांना दरवेळी सगळ सांगता येतच नाही. मी नाही म्हणते कि मला तू सांग. पण काही मदत करू शकत असले तर करीन." 
वाक्याच्या शेवटी हळू हळू होत गेलेला तिचा आवाज. ती genuinely बोलत होती. He can always tell. 
"भीती वाटते मला!" 
"भीती वाटते डोळे बंद करायची!" 
"भीती वाटते स्वताच्या विचारांची आणि स्वताच्या मनाबरोबर एकट राहाव लागेल कि काय याची!"
"त्याच्यापेक्षा गर्दीत हरवून झाण सोप! एक नुसता चेहर्याचा ठिपका होण बर! ना आगा ना पिछा!"
"पण अस कोरड होण तर कधी जमतच नाही. कोडगेपणा रक्तातच असायला हवा. नंतर कितीही प्रयत्न केले तरी भिनवता येत नाहीच पुरेसा. आणि मग फक्त ओढताणच होते..."
ती आता सावरून बसली होती. त्याचा असा भांध फुटलेला तिनी कधीच पहिला नव्हता. 
तो आता बोलायचं  थांबला होता. हळू हळू श्वास शांत होत होता. त्याने उगाचच घसा खाकरला. मान झटकल्यासारखी केली.
"Thank You. That helped." त्याचा आवाज वरमल्यासारखा होता. 
"पण मला अजून तू काहीच सांगितला नाहीयेस."
"जे सांगायच होत ते सांगून झाल. घटना, व्यक्ती आणि घडलेल्या घडामोडी मध्ये आणून जे शेवटी  सांगायच होत ते असच काहीतरी असणार होत. उलट ते props आणि details नव्हते हे चांगलच झाल."
तिच्या चेहर्यावर एक all-knowing smile आल. त्याच्या चांगलच ओळखीच आणि राग आणणार. पण आत्ता नाही. 
"You know what - Stop looking for an excuse to blow up your life."
तो एकदम चमकला! जोरात आलेल्या वार्याने पळवून लावलेल्या ढगानंतर निळ्याशार होणार्या आभाळासारख त्याला काहीतरी एकदम वाटल. त्याने डोळे वर केले. ती त्याच्याकडेच बघत होती. शांतपणे. एकटक. जणू ती थांबली होती - तो बोलण्यासाठी.
तिच्या काळ्याभोर डोळ्यात टक लावून मंदपणे हसत तो एकच वाक्य म्हणाला - 
"I am so glad we are not friends."
----------------------------------------------------------------------------------------------------------

Saturday, May 7, 2011

नितळ बघितला काल. एक वेगळाच विषय फारसा आव न आणता मांडण्याचा चांगला प्रयत्न वाटला मला तरी.
गडगंज संपत्ती असलेल्या, serial वाल्या घरांनाही लाजवू शकेल अशा typical joint family मध्ये लहानाचा मोठा झालेला घरातला ३५ वर्षांचा अविवाहित डॉक्टर अंगभर कोड असणाऱ्या त्याच्या डॉक्टर मैत्रिणीच्या प्रेमात पडतो. प्रत्येक वयोगटाचे, वेगवेगळ्या पिढ्यांचे लोक कशा पद्धतीनी या बातमीला खळबळजनक बनवून react करतात आणि कशी सामाजिक, सांस्कृतिक आणि वाडवडिलांच्या संस्कारांचा side-effect म्हणून म्हणा किंवा आजूबाजूच्या समवयीन लोकांच्या वागणुकीचा आपल्यावर होणार्या परिणामामुळे म्हणा, खोलवर रुतून बसलेली "apparent" मुल्ये शेवटी चांगल्या-वाईटाच्या व्याख्या ठरवतात हा movie चा मूळ मुद्दा. आता इतका open-ended विषय निवडल्यामुळे आणि debate च्या सगळ्या बाजू मांडता आल्या पाहिजेत म्हणून characters तशी बरीच crudely generalized आणि stereotyped आहेत. प्रेमळ आजोबा, self-involved आणि rude काका, military खाक्याचे आणि कदाचित म्हणूनच कधीच काही बोलून न दाखवणारे वडील,social circle आणि social status च्या विचारांनी नाक मुरडणार्या काक्वा, "काय बिघडला यात" असं blindly म्हणणारे teen cousins आणि आपण कसे नवीन विचारांचे progressive लोक आहोत हे ठसवण्यासाठी ambivalent राहणारे धूर्त लोक....characters चा संपूर्ण गोतावळा आहे आणि काही काही संभाषणं पण खरोखरच विचार करायला लावणारी आहेत. हा रोग नाही तर फक्त lack of a pigment आहे, एखाद्याची identity हि फक्त बाहेरच्या रूपावर अवलंबून नसते, rebel करून आणि भांडून लग्न करता येईल आणि पाहिजे ते मिळवता येईल पण सुख मिळेल का वगैरे प्रश्न मांडून आणि purposefully ते unanswered ठेवून प्रत्येकाला त्याच्या point of view नि ते interpret करता आले पाहिजेत हा movie चा message पण चांगला आहे. पण.....
माशी शिंकायलाच हवी कुठेतरी.....
मला तरी एक गोष्ट जाम खटकली. 'तारे झमीन पर' बघताना पण खटकली होती, पण तेव्हा the drama of the movie overpowered me; कि अशा movies मध्ये आणि by "अशा", i mean कि अशा movies ज्या काहीतरी चाकोरीबाहेरचे विषय मांडतात, त्यांच्यामध्ये almost invariably, the "unlucky" character(who by definition has to be the protagonist) always has something to compensate for his "defect". म्हणजे तारे झमीन पर मधलं पोरगं हे एकदम gifted artist निघतं! काय probability आहे खऱ्या जगात असं होण्याची? दहा लाख मुलांमध्ये २० dyslexic असली तर त्यातली १९ मुलं हि average मुलंच नसणार का? आणि नेहमीपेक्षा खूप जास्त, खूप वेगळे कष्ट घेऊन average perform करत येणं हि पण एक त्यांच्या दृष्टीनी groundbreaking achievement नाही का? पण हे realistic दाखवणं तर सोडाच, अशा प्रकारच्या movies त्या protagonists च्या त्या overcompensating "abilities" ना "glorify" करतात! म्हणजे आधी जर त्यांच्या defect नि त्यांना objectify करण्यात येत असलं तर शेवटी त्यांच्या खतरनाक talent मुळे objectify केलं जातं. आणि सगळं normal चं दाखवलं तर story कुठे राहिली आणि drama कुठे राहिला हा मुद्दा च माझ्या मते void आहे. जर तुम्ही काहीतरी वेगळं करायला घेतलंय तर ते संपूर्णपणे तसच ठेवा, उगाच safe option निवडून तुम्ही स्वताच स्वताच्या विषयाला आणि मांडणीला खिजवताय कि काय असं वाटतं राहत .... नितळ मध्ये सुद्धा "काय talented surgeon आहे ती आणि किती सुंदर गाते बघा!" असं तो मुलगाच म्हणतो. अरे हे काय! म्हणजे चांगलं गाता येत नसतं तर नाही म्हणणार होता का तो? चांगल्या गोष्टींवर focus करावं, वाईट गोष्टी आणि disabilities पेक्षा, या point of view नि जर अशा गोष्टी include करण्यात येत असल्या तर it is even worse because it sends out a message कि हा defect वाईट आहे! पण यामुळे जे 'negative connotation" मिळाल तेही वाईटच! मूळ मुद्दा कि यात काही वाईट नाहीये तर it is a way of life हे सांगणं मागेच पडून जातं कुठेतरी आणि viewer काय शिकून जातो कि defect असलं तरी जोपर्यंत काहीतरी त्याला compensate करणारी ability आहे तोवर काळजीच काही कारण नाही..... And it is exactly this kind of thinking which defeats the purpose of why the movie was made in the first place....
नाही का? असो....

Friday, October 22, 2010

...........

त्या त्या वेळेस बरोबर वाटलेले पण शेवटी चुकिचेच ठरलेले decisions.......
कुठल्यातरी senseless, useless inhibitions मुळे अडखळलेल पाउल, गिळले गेलेले शब्द, फिरवलेली मान आणि झटकून टाकलेले विचार.......
कशाचाच कशाला मेळ नाही,
एक नुसतीच खोल दरी! कधीच न संपणारी! काळी! भीषण!
अगदी हाडापर्यंत पोचणारी ती बोचरी भीती,
सहन पण न होणारी ती शांततेची पोकळी....अंतर्मुख बनायला सुद्धा घाबरवून सोडणारी ती compulsively बोलायची need.....
आणि शेवटी नुसतेच शब्द......एकापाठोपाठ एक......न संपणारे,
अखंड................

Saturday, April 10, 2010

Really??

छोट्या छोट्या, अव्यक्त आणि फुटकळ वाटणाऱ्या गोष्टीच कधी कधी उगाचच लक्षात राहतात.........
खरं सांगायचं तर असं काहीच groundbreaking घडलेलं नसतं, त्यांमधून मिळालेला आनंद, किंवा सलणार दुःख हे literally क्षणिक असतं पण तरी सुद्धा अनेक obviously भावना demand करणाऱ्या गोष्टींपेक्षा - काहीतरी अशा seemingly insignificant गोष्टींमुळे 'झालेल्या' भावना(खरं तर इथे 'प्रसवलेल्या' हे क्रियापद जास्त fittt बसेल पण जाऊ दे :-P) - या का बरं एवेढ्या भावतात? कडकडून मिठी मारण्यात तर एक आनंद असेलच - पण नुसते डोळे जरी भिडले तरीसुद्धा जे butterflies येतात ते हि एवढे हवेहवेसे का वाटतात? हसत खिदळत टाळ्या देत मजा करणं औरच आहे - पण ६ महिने फारसा contact नसताना अचानक 'तुझे फोटो पाहिले - भारी वाटलं' हा एकच ओळीचा offliner पण तेव्हढाच जवळचा का बरं वाटतो? कदाचित अव्यक्त राहण्यात पण एक गम्मत असेल - overtly expressive नसणं हाच त्यांचा express करण्याचा एक भाग असेल - मला वाटतं कि expressive असताना आपण भावनांना labels देऊ शकतो - मला आनंद झाला - वाईट वाटलं असं marked distinction करता येत - पण काही भावना अबोल च बऱ्या असतात - आणि त्यांचं ते अबोल असणं हेच सुंदर असतं

कितीदा तरी होतं असं माझं, कुणीतरी काहीतरी बातमी सांगतं आणि मग त्यावर एका socially accepted way नि react करणं अपेक्षित असतं, म्हणजे अरे हि आनंदाची बातमी आहे, आनंद दाखवला पाहिजे , दुखः दिसलं पाहिजे, पण कधी कधी तसं जमतच नाही, कारण काय वाटतंय, नक्की काय भावना आत्ता मनात आलीये, ते either कळलेल तरी नसतं or कळून ती दाखवायला मन धजावत नसतं. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे त्याची तीव्रता; त्या संवेदनेची 'level' म्हणू आपण; अजून अपेक्षित intensity ला पोचलेली नसते - ज्याला not necessarily फक्त वेळेचीच गरज असते पण कधी कधी एखाद्या घटनेचीपण.Again, 99% of the times आपण आपोआप बरोबर react करतोच ,केलं जातंच, पण कधी कधी जमत नाही हे हि तेव्हढंच खरं. मन नुसतंच कोरडं राहत. अर्थात हे सगळं त्याच वेळेला लागू होतं जेव्हा सांगणाऱ्याला, ऐकणाऱ्या कडून जी भावना invoke करायची असते तीच ऐकणाऱ्याकडून खरच invoke होते or invoke होण्याची शक्यता तरी जास्त असते. उदाहरणार्थ "हारल रे manU" असं मला कुणी सांगितलं expecting कि मीहि त्याच्या दुख्हात सहभागी होणार तर चुकलास मित्रा, पण जेव्हा सगळं काही नीट होऊन मनानी शहाण्यासारखं वागणं, react करणं अपेक्षित असतं पण तरीही ते होत नाही, तेव्हा मग ते हास्य 'हास्य' राहत नाही, काहीतरी उगाचच भेसूर होऊन जातं, चेहरा आंबट होऊन जातो आणि वाईटातली वाईट गोष्ट म्हणजे ते आपल आपल्यालाच फक्त दिसत असतं.......

असो, assuming कि हा प्रत्येकाच्या स्वभावाचा एक अविभाज्य घटक आहे, let me get back to what i wanted to say originally. जर आपण अश्या "बटबटीत"(honestly for the lack of a better word - साली मातृभाषेची शब्दसंपत्ती इतकी वरवरची आणि वीर GRE देतात!) घटनांना, गोष्टींना इतकं महत्व देतो, or rather accepted interaction norms नुसार, चाकोरीबाहेर जाऊन "हे असं बरोबर नाही दिसणार च्यायला" म्हणून त्यांना 'अवाजवी' - निदान त्या क्षणापुरतं तरी ते नक्की 'अवाजवी'च असतं - भाव देतो, तर मग लहानश्या, क्षणिक, irrelevant, childish, "हु त्यात काय एवढ" वाटणाऱ्या गोष्टींना थोडसं महत्व दिलं तर त्यात काय चुकलं? सगळ्याच गोष्टींना आनंद, दुखः अशा crude generalizations मध्ये का बसवायचं? अर्थात या गोष्टी प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या मानसिकता, संवेदनशीलता, एकूणच व्यक्तिमत्व कसं आहे - थोडक्यात भावना feel करण्याची त्या व्यक्तीची index किती आहे - यानुसार त्यांचं स्वरूप, त्यांचा seriousness - from others' point of view of course - बदलणार पण तरी सुद्धा त्या व्यक्तीपुरततरी त्याच महत्व तिळमात्र कमी नाही होत. आता गेल्या काही महिन्यातल्याच अशा काही गोष्टी कि ज्या बहुतेक 'पांचट' या category मध्ये बसतील, stupid म्हणून हिणवल्या जातील इतरांकडून पण असं होणं हीच त्यांच्या relevant असण्याची पावती असेल :-P
अशाच काही सटरफटर गोष्टी - आयला माझा blog आहे, मी काहीही idiotic पण टाकीन!

1)आपण काहीच करत नाहीरे, काहीतरी करायला पाहिजे, कुठतरी जायला पाहिजे अशी तावातावानी चर्चा होऊन, त्याचा शेवट चला भेळ खाऊ/कॉफी पिऊ/जेवायला जाऊ/cadb खाऊ याने होणं आणि यातलं काहीतरी केल्यावर खरच चांगलं वाटणं!
2)एखादं गाणं अगदी enjoy करत ऐकत असताना - एखादं कडव संपलं कि जो momentary lull येतो त्यात गाणं संपलंय असं वाटण पण तेव्हढ्यात अजून राहिलेलं ते शेवटचं कडव चालू होणं आणि उगाचच चेहऱ्यावर एक smile येणं.... :-)
3)एक वाईट, खोल, घाणेरडा खड्डा, bike वेगात, break दाबण शक्य नाहीये, खूप गचका बसणारे, गाडीची वाट लागू शकते जाऊ दे च्यायला, घाला तशीच - आणि त्याच वेगामुळे असुदे किंवा उगाचच extra मानसिक तयारी केल्यामुळे असुदे - bike अशी हलकीच cruise होत गेल्यासारखी वाटणं.............
4)buzz च्या edit profile मध्ये - "Something I can't find using Google" च्या example options मध्ये paradise,love,atlantis याबरोबरच 'Oceanic 815' पण दिसण :-P

असो.
बाकी काहीही नाही तरी 'वायफळ बडबड करणे' हा purpose तरी या post नि नक्की complete केला असेल!

PS: I hope the symbolism in the last line is obvious :-)

Wednesday, August 12, 2009

वर्षांतर

[Updated]

"एक वर्ष झालं कि घोड्या!" शेवटच्या exam नंतर गोव्याला जाऊन ढोसलेल्या दारूचा वास जातो न जातो तोच job चालू झाला होता आणि आज, अक्षरशः बघता बघता एक वर्ष उलटलं कि! चार quarters, एक performance review, बारा महिने आणि ३६५ दिवस जगुन पण झाले च्यायला , मी officially म्हातारा पण झालो :P

Techinically सांगायचं तर २-३ आठवड्यापूर्वीच माझा हा वाला 'वाढदिवस' झाला - पण नेहमीप्रमाणे त्या दिवशी काहीच 'वाढ' झाल्यासारखं वाटलं नव्हतं - ते म्हणा कधीच वाटत नाही - पण काहीतरी विचित्र, वेगळ अस feeling पण नव्हतं - ते असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींमधूनच कळत जातं - for example - friendship day :) तसं बघायला गेलं तर या वेळेला पण मागच्या वेळ सारखाच आणि मागच्या वेळ एवेढाच राडा आणि गोंधळ घातला पण मुद्दा असा कि मागच्या वर्षी आणि या वर्षी मी ज्या लोकांबरोबर होतो - ते २ sets अक्षरशः mutually exclusive होते - अर्थात एक दोन अपवाद सोडून ! आणि मग वाटून गेलं खरच केवढं बदललय सगळं, आतून बाहेतून! Stress points, pressure चे मुद्दे , दिनक्रम , body clock अगदी अथपासून इथिपर्यंत सगळं :-)

तसं बघायला गेलं तर कुठलाच बदल हा चांगला किंवा वाईट नसतो - तो फक्त अपरिहार्य असतो! आणि कितीही तयारी केली , कितीही मानसिक समजूत घालून ठेवली तरीसुद्धा कोण कुठल्या change ला कसा, कितपत adapt होईल हे काळच ठरवतो. लोकं म्हणतात कि बदल त्यांनाच मानवतो जे बदलायला तयार असतात - but i don't think its about being the fittest to survive the change, its about surviving the change to be the fittest. हे म्हणजे लाटा उसळणाऱ्या समुद्रात उभं राहण्यासारखं आहे. आपण एकाच जागी राहायचा ठरवलं तर आपल्याच नाका-तोंडात पाणी जाणार आपलीच चिडचिड होणार आणि main म्हणजे आपल्यालाच त्यांची मजा नाही अनुभवता येणार! त्याउलट जर आपण क्षणभर रोवलेले पाय सोडून तरंगायला तयार असलो, तर लाटांच्या लयीत वर खाली होणं काही फारसं अवगढ नसतं :) लाटा तर relentlessly येतंच राहणारेत - त्या थांबवण्याची क्षमता आपल्याकडे कधीच नव्हती - त्या आपल्यावर आदळतच राहणारेत - त्यांना आदळू द्यायचा का नाही हा option सुद्धा आपल्याकडे कधी नव्हताच - कधीच नसणारे....असो. :)

आता नवीन जॉब, नवीन माणसं, नवीन काम, नवीन जग - या सगळ्या tangible गोष्टी झाल्या - पण याचबरोबर खूप साऱ्या intangible गोष्टी पण आहेत ज्यांच्यामुळे i had a real blast this year!! अर्थात सगळ्याच, सगळ्यांना सांगण्यासारख्या नाहीत - पण at least काही factors तरी नक्की deserve करतात :) ->

1)"s/w मध्ये जॉब आहे" हे सांगितल्यावर उंचावणाऱ्या भुवया, अगदी थोडेसेच पण तरीही noticeable असे मिचमिचे झालेले डोळे , "हो का?" "बर बर" "छान हो" वगैरे घिसेपिटे responses आणि "हा पण त्यांच्या team मध्ये गेलेला दिसतोय" असं बोलणार ते कुत्सित हास्य - विशेषतः काका-काकू वयोगटातल्या लोकांचं - या सगळ्याची पहिल्यांदा सवय करून घ्यावी लागली :) तसं बघायचं तर मी s/w engineersच्या सेकण्ड generation मधला आहे असं म्हणायला हरकत नाही - त्यामुळे ' s/w चे लोक म्हणजे जास्त पगार मिळणारे आणि म्हणून स्वताला दीड शहाणे समजणारे ' हि समजूत आता रुजून कुजून जुनी झालीये - so तुका म्हणे याबद्दलचे वाद मला तरी फारसे सहन करायला लागले नाहीत.

2) माझ्या कंपनी च नाव - 'Marvell Semiconductors' -
"हि कुठली कंपनी बरं? तुला IBM/Infosys ची offer होती असं म्हणाला होतास ना? काय झालं त्याचं? तिकडं का बर नाही गेलास??" असं जेव्हा चेहऱ्यावर आर्त भाव आणून "कुठे आहेस तू" या प्रश्नाच्या माझ्या उत्तरावर लोक react करायचे तेव्हा खरच a little part of me used to die inside :) यात कुणाचीच काहीच चूक नाही - माझी मात्र पक्की विकेट गेलेली असायची!

3)चंगळवाद
वडा पाव २ चा ५, ५ चा १० आणि १० चा २० झालाय म्हणून कुरकुर काही थांबवली गेलेली नाही - फक्त आता वडा पाव खाण्याचं प्रमाण मात्र कमी झालंय . high-earning-high-spending-mall संस्कृती वगैरे वगैरे वादात मला पडायचंच नाहीये - किंवा rather ते नंतर कधीतरी - पण एक गोष्ट मात्र खरी - कि स्वत कमावलेले पैसे खर्च करताना जे भारी वाटतं ते शब्दात नाही सांगता येणार -
पैसे चांगल्या पद्धतीने, कसे खर्च करायचे हे खूप कमी लोकांना कळत, मान्य!
आहेत म्हणून फक्त दिसेल त्यावर पैसे खर्च करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे, मान्य!
पण हि चंगळवादाची definition च नाही मुळी - हि तर नुसती 'चंगळ' झाली :P
चंगळवाद हा peer pressure नि येतो - "shit अजून आपल्याला Basho's कुठं हे माहिती नाही" , "अजून चांदणी चौकातल्या Apache मध्ये जायचं राहिलंय" - "आयला अजून Casanova मध्ये नाही गेलेलो" असं जेव्हा अगदी 'आतून' वाटायला लागत ना तेव्हा वेळ आलेली असते चंगळवाद join करण्याची! चंगळवाद हि म्हणून तर एक चळवळ आहे - joint effort - distributed system - असो चंगळवादाचा detailed manifesto नंतर कधीतरी :-P

4)Recession -
एखादं अवजड दार खालती पडून बंद होण्याच्या just आधी खालच्या फटीतून - निसटून वाचलेली batch - म्हणजे माझी batch! आम्ही s/w industry मध्ये पाऊल ठेवलं ना ठेवलं तोच recession चालू झालं - timing पण अगदी सुरेख जुळून आलं तसं आमचं! ३-४ महिन्यातच काहींचे जॉब गेले - ऑफिस मधल्या सगळ्या freebies बंद झाल्या - आणि नाही म्हटलं तरी एक tension च फिलिंग आलेलं असायचं - पण जाऊ दे - कदाचित हा पण एक lesson च होता - सुरुवातीलाच या पेशाचा भेसूर चेहरा बघायला मिळाला, असो :)

५) रोजच्या बोलण्यामध्ये आलेलं sophistication - म्हणजे असं निदान मला तरी वाटतंय -
'mail-a-mail-i' मध्ये येणारे references बाजूला ठेवले तरी बोलण्यामध्ये सुद्धा Thank you - sorry - thanks - वगैरे म्हणायचं प्रमाण वाढलंय - परवा तर चक्क मी movies आणि serials कॉपी करून घेतल्या नंतर एका मित्राला thank you म्हणालो - त्याला पण जरा चुकल्या चुकल्या सारखं झालं असेल :-P

तर म्हणता म्हणता एक वर्ष तरी survive झालंय बघू पुढे काय होतं ते - पुढचं पुढे :)

-----------
वेदांग नि seriously मनावर घेऊन ह्या Post च English मध्ये भन्नाट translation केलेलं आहे - इथे .
धन्यवाद वेदांग!