"निर्मनुष्य" हा काही एक साधासुधा गूढकथासंग्रह नाही. प्रत्यक्ष आणि वास्तवाच्या पलीकडे लपलेले, थोडेसे भयावह पण तरीही थोडेसे उत्कंठावर्धक आणि काहीसे अनाकलनीय असे काल्पनिक विश्व लेखक रत्नाकर मठकरी प्रत्येक कथेत बिनबोभाट उभे करतात ! परंतु या कथांचा हेतू फक्त भय निर्माण करणे असा वाटत नाही, लेखक त्यातून काही भाष्य करू पाहतात कधी मानवी स्वभावाबद्दल, कधी राजकारणाबद्दल तर कधी सामान्य माणसाच्या हतबलतेबद्दल. "निर्मनुष्य" वाचताना स्टीफन किंग च्या लेखनशैलीची नक्कीच आठवण होते ! प्रगल्भ आणि तरीही मनोरंजनात्मक असा "निर्मनुष्य" ४/५ च्या नक्कीच तोडीचा आहे.
No comments:
Post a Comment