"जुने कधीही सर्वस्वी टाकाऊ व सर्वस्वी गैरलागू होत नाही; नवे ते इतके नवे कधीच नसते कि त्यात जुन्याचा अंशच नाही!"
महाभारतामधल्या अमानवी आणि चमत्कारमय गोष्टी बाजूला ठेऊन एका Anthropologist च्या दृष्टिकोनातून रोखठोक आणि तर्कशुद्ध पद्धतीने लिहिलेलं इरावती कर्र्वेचं "युगान्त" म्हणजे माझ्या सारख्या महाभारत चाहत्याला पर्वणीच! १९६० च्या दशकात प्रकाशित झालेले हे लेखं आत्ता ६० वर्षांनी वाचतानासुद्धा थांबवत नाही. सहज, साधी, सोप्पी भाषा आणि तरीही झटक्यात खोल मतीतार्थ स्पष्टपणें मांडणं हि तारेवरची कसरत प्रत्येक लेखात दिसून येतें. विशेषतः "भीष्म" आणि "कृष्ण" यांच्याबद्दलच्या लेखांमध्ये केलेल विश्लेषण आणि मांडलेले विचार हे अंतर्मुख करून सोडतात.
"महाभारताचा अभ्यास व्हावा तो मोकळ्या दृष्टीनें. अभ्यासाआधीच ठाम मते ठरवून भक्तिभावानेही होऊ नये आणि आवेश किंवा द्वेषभावनेनेही होऊ नये इतकीच ती प्रार्थना!"
शक्य झालं तर मूळ मराठी प्रतच वाचा!
No comments:
Post a Comment