Sunday, June 21, 2009

नाटकीपणा - भाग एक

[Long Post]

खर सांगायच तर नाटकातल मला ओ-की-ठो कळत नाही। कॉलेज च्या काळात पुरुषोत्तम, फिरोदियाशी आपला सम्बन्ध फक्त जोरजोरात cheering करायला जाणे, घसा फोडून बोम्बलायला मिळणे आणि बाकीच्या colleges च्या पोरी बघायला जाणे एवढाच होता. आम्ही आपले बोरू-बहाद्दर - मारे हे पुस्तक वाचलय, ती कथा वाचलिये अस सांगत फिरणारे - असो. तर मुद्दा असा की भले आपल्याला एखाद्या विशयातल टिचभर जरी कळत असल तरी मनसोक्त, कुणाचीही तमा न बाळगता ते ज्ञान पाजळायला blog ही सोप्पी पळवाट आहे - नव्हे गेल्या काही महिन्यात असे हजारो self-proclaimed blogs वाचून हे गरजेचच आहे हे मला पटलय. अहो orkut, twitter एवढच blogger वरचा अकाउंट असण महत्वाच आहे अस म्हणतात लोक - तर मग अशाच एका blogger च वाक्य - त्याच्या परवानगीशिवाय ढापून मी वापरतो - ' अगदी पुण्यात बटाटे कुठे चांगले मिळतात तिथपासून ते Estonia च्या अर्थव्यवस्थेवर s/w industry recession चे उमटलेले पडसाद' यावर मी छातीठोकपणे मत मांडूनच राहणार! आणि म्हणूनच जरी भले माझे ५-६ मित्रच हा ब्लॉग वाचत असले ( च्यायला orkut आणि facebook वर अधाशासारखे friends add करून काही उपयोग होत नाही सांगतो ) तरी मारे greatBong वगैरे तत्सम कसलेल्या bloggers सारखं मी वरती 'Long Post' अस चावटपणे लिहिलंय हे सूज्ञांच्या लक्षात आल असेलच :-P

हा तर मुद्द्याची बात - नाटकं. गेल्या ३ आठवड्यांच्या कालावधीत मी पक्की '५' नाटकं बघितली. आता प्रायोगिक, experimental, artistic, aesthetic, भन्नाट, तुफान, layyyy bhaaarrrii, फोडलंय, एक वेगळीच संवेदनशीलता लागते अशी नाटकं बघायला, वगैरे सगळी विशेषणं लागू होतील अशी नाटक होती ती. खरं सांगायचं तर " झेपत असेल तर बघा नाहीतर उगाच नंतर कळलं नाही म्हणून शिव्या घालत रडत बसू नका " हा सुप्त encrypted अर्थ या सगळ्या विशेषणा मागे दडलाय हे मला अनुभवांती कळलंय आता. तसं बघायचं तर अशा नाटकांना 'spoilers' असा काही प्रकार नसतो - त्यामुळे तुम्ही हि नाटकं बघणार असाल किंवा बघणार नसाल, बघितली असतील किंवा नसतील, माझ्या विशेष टिप्पण्या (म्हणजे अचरटपणा) वाचून काही फरक पडेल असं मला वाटत नाही. Again, मला साहित्यिक बारकावे, theatrical भावभावना, artistic संवेदनशीलता वगैरे कळत नाही. मी आपला एक पोट सुटलेला, केस विरळ होत चाललेला, चंगळवादी संस्कृतीचा पामर s/w engineer आहे - अजाण अबोध बालक - आणि म्हणून हि बडबड सर्वतोपरी 'उथळ' आहे हे ओघानी आलच :-)

१. "आ जा मेरी गाडी में बैठ जा"
मी सुरुवातीला ठरवलं होता कि २-३ वाक्यात आधी नाटकाची theme सांगायची आणि मग पुढे जायचं पण देवाशप्पथ खरं सांगतो खोटं बोलत नाही - मला हे नाटक कशाबद्दल आहे, काय आहे, का आहे, purpose काय, जे घडतंय ते का घडतंय, कस, कुठे, कधी, का काहीच कळलं नाही. स्त्री-पुरुषांमधले संबंध - वेगवेगळ्या वयोगटातले , वेगवेगळ्या वयोगटातल्यांचे ; कालानुपरत्वे येणारा relationship मधला शीळेपणा; एका मर्यादेबाहेर एकमेकांना ''granted for' धरले जाणे; पोटतिडीकीने, तिरस्काराने दुसर्याला लागेल असे बोलणे आणि नुसते बोलणे नाही तर ते अक्षरशः ओरबाडून सांगणे; प्रेमात पडण्याची अधीरता, प्रेमात पडल्या नंतरची स्वताच स्वताची केलेली ससेहोलपट या आणि अशा अनेक भावनांचा नुसता भडीमार होतो. २ नच पात्र आहेत पण तरीही खूप loud, बटबटीत वाटत. पण त्याला कुठेच कथेचा एकसंधपणा नाही आणि अशी काहीच theme नसल्यानी नको तिकडे हशा मिळतो, हिरो नि shirt काढल्यावर शिट्ट्या मारणे वगैरे अचकट प्रकार चालू होतात आणि माणूस bore होतो. त्यात दीर्घांक. १२० minutes सलग.मला almost झोप लागली होती पण मित्रानी अगदी हातवारे वगैरे करून उठवलं म्हणून. त्यात हे कुठल्यातरी Russian का greek का egyptian कथेच नाट्यरूपांतर आहे - मला खरच लक्षात ठेवावं वाटलं नाही - कारण उगाच नंतर शोधून ती कथा वाचालीये वगैरे भानगडच नको म्हणल :)

2. "तू"
आत्तापर्यंत बरीच पारितोषिक मिळवलेलं आणि सर्वार्थानं नावलौकिक वगैरे असलेलं हे नाटक. विषय अर्थात प्रेम आणि लिहिलंय एका कवयित्री नि. कवीला कुठल्या डोळ्यांनी, कुठल्या चष्म्यातून, कुठल्या आवरणातून जग दिसत कोण जाणे - तासंतास बडबड केली तरी देखील शब्दात मांडता येणार नाहीत अशा भावना ज्यांना दहा ओळीत सुबकपणे बंदिस्त करता येतात त्यांना माझं seriously दंडवत. यात एक साधारण ५० कविता आहेत - गद्य स्वरुपात - अगदी slightly connected stories च्या format मध्ये गुंफलेल्या , arabic किंवा persian backdrop असलेल्या. नाटक सुरु होतं एका प्रियकर प्रेयसी च्या उत्कट प्रवेशापासून. नंतर खूप खूप प्रेम, विरह, दुख, मदिरा, बेधुन्दी, बेहोशी, स्वताला झोकून देणं, हरवून जाणं, जगाच्या आणि जीवाच्या अंतापर्यंत मी तुला शोधेन, मी तुझ्यासाठी थांबेन वगैरे सगळं होतं. कलाकार बरेच आहेत, सगळेच चांगले कसलेले, energetic आहेत. नाटक खिळवून नक्की ठेवतं पण मला असं कुठेतरी वाटलं कि हे लोकं कवितेचं interpretation आपल्यावर enforce करतायत - कविते मधली भावना त्यांच्या अभिनयानी नक्कीच जास्त 'ग्राफिक' स्वरुपात बाहेर येते - पण मग 'कविता भावली' हे जे feeling प्रत्येकाला येत कधी न कधी तरी एखादी कविता वाचल्यावर - जे प्रत्येकाचं वेगळं असतं, unique असतं आणि ते त्याच्या मानसिकतेशी जोडलेलं असतं - तेच कुठे तरी हरवून गेलं असं वाटतं.

असो आज एवढंच 'उंटावरून शेळ्या हकण'....... बाकिच नंतर

क्रमशः