विजय तेंडूलकरांच्या २५-३० वर्ष्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दी मधल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित होऊन गेलेल्या आणि १-२ नवीन लिहिलेल्या कथांचा संग्रह म्हणजे "तेंडूलकरांच्या निवडक कथा".
भाषेची सहजता हे त्यांच्या लिखाणाच वैशिष्ट्य, पण या सहजसुंदर, प्रसंगी रोखठोक भाषेमध्ये सुद्धा अंतर्मुख करून सोडणारी आणि मनावर एक खोलवर ठसा उमटवणारी तेंडुलकरांची प्रतिभा या साहित्य कलाकृतीत पुरेपूर दिसून येते. कथेतली पात्र हि जिवंत आणि खरी तर वाटतातच पण त्यांचा संघर्ष, चलबिचल आणि कधी कधी मानलेली हार हि मनाला घर करून जाते.
तत्कालीन समाजव्यवस्थे बद्दलचे, स्त्री-पुरुष भेदभावा बद्दलचे आणि सर्वसाधारण ढोंगी धर्मकांडा बद्दलचे संवेदनशील निरक्षण आणि प्रसंगी काहीच न करता आल्यामुळे होणारी पोटतिडीक आणि तडफड हि कथांमध्ये विलक्षण पद्धतीने मांडलेली आहे. विशेष लक्षात राहणाऱ्या कथा म्हणजे 'चौऱ्हात्तर पावसाळ्यांचा जमाखर्च', 'गाणे' आणि 'मित्रा'.
मानवी गुंतागुंतीकडे पाहण्याचा तेंडूलकरांचा आस्थेवाईक दृष्टीकोन, कमालीची अकृत्रिम भाषा आणि मार्मिक व्यक्तिचित्रण, 'निवडक कथा'नसाठी खरोखर ५/५च योग्य !