Wednesday, August 12, 2009

वर्षांतर

[Updated]

"एक वर्ष झालं कि घोड्या!" शेवटच्या exam नंतर गोव्याला जाऊन ढोसलेल्या दारूचा वास जातो न जातो तोच job चालू झाला होता आणि आज, अक्षरशः बघता बघता एक वर्ष उलटलं कि! चार quarters, एक performance review, बारा महिने आणि ३६५ दिवस जगुन पण झाले च्यायला , मी officially म्हातारा पण झालो :P

Techinically सांगायचं तर २-३ आठवड्यापूर्वीच माझा हा वाला 'वाढदिवस' झाला - पण नेहमीप्रमाणे त्या दिवशी काहीच 'वाढ' झाल्यासारखं वाटलं नव्हतं - ते म्हणा कधीच वाटत नाही - पण काहीतरी विचित्र, वेगळ अस feeling पण नव्हतं - ते असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींमधूनच कळत जातं - for example - friendship day :) तसं बघायला गेलं तर या वेळेला पण मागच्या वेळ सारखाच आणि मागच्या वेळ एवेढाच राडा आणि गोंधळ घातला पण मुद्दा असा कि मागच्या वर्षी आणि या वर्षी मी ज्या लोकांबरोबर होतो - ते २ sets अक्षरशः mutually exclusive होते - अर्थात एक दोन अपवाद सोडून ! आणि मग वाटून गेलं खरच केवढं बदललय सगळं, आतून बाहेतून! Stress points, pressure चे मुद्दे , दिनक्रम , body clock अगदी अथपासून इथिपर्यंत सगळं :-)

तसं बघायला गेलं तर कुठलाच बदल हा चांगला किंवा वाईट नसतो - तो फक्त अपरिहार्य असतो! आणि कितीही तयारी केली , कितीही मानसिक समजूत घालून ठेवली तरीसुद्धा कोण कुठल्या change ला कसा, कितपत adapt होईल हे काळच ठरवतो. लोकं म्हणतात कि बदल त्यांनाच मानवतो जे बदलायला तयार असतात - but i don't think its about being the fittest to survive the change, its about surviving the change to be the fittest. हे म्हणजे लाटा उसळणाऱ्या समुद्रात उभं राहण्यासारखं आहे. आपण एकाच जागी राहायचा ठरवलं तर आपल्याच नाका-तोंडात पाणी जाणार आपलीच चिडचिड होणार आणि main म्हणजे आपल्यालाच त्यांची मजा नाही अनुभवता येणार! त्याउलट जर आपण क्षणभर रोवलेले पाय सोडून तरंगायला तयार असलो, तर लाटांच्या लयीत वर खाली होणं काही फारसं अवगढ नसतं :) लाटा तर relentlessly येतंच राहणारेत - त्या थांबवण्याची क्षमता आपल्याकडे कधीच नव्हती - त्या आपल्यावर आदळतच राहणारेत - त्यांना आदळू द्यायचा का नाही हा option सुद्धा आपल्याकडे कधी नव्हताच - कधीच नसणारे....असो. :)

आता नवीन जॉब, नवीन माणसं, नवीन काम, नवीन जग - या सगळ्या tangible गोष्टी झाल्या - पण याचबरोबर खूप साऱ्या intangible गोष्टी पण आहेत ज्यांच्यामुळे i had a real blast this year!! अर्थात सगळ्याच, सगळ्यांना सांगण्यासारख्या नाहीत - पण at least काही factors तरी नक्की deserve करतात :) ->

1)"s/w मध्ये जॉब आहे" हे सांगितल्यावर उंचावणाऱ्या भुवया, अगदी थोडेसेच पण तरीही noticeable असे मिचमिचे झालेले डोळे , "हो का?" "बर बर" "छान हो" वगैरे घिसेपिटे responses आणि "हा पण त्यांच्या team मध्ये गेलेला दिसतोय" असं बोलणार ते कुत्सित हास्य - विशेषतः काका-काकू वयोगटातल्या लोकांचं - या सगळ्याची पहिल्यांदा सवय करून घ्यावी लागली :) तसं बघायचं तर मी s/w engineersच्या सेकण्ड generation मधला आहे असं म्हणायला हरकत नाही - त्यामुळे ' s/w चे लोक म्हणजे जास्त पगार मिळणारे आणि म्हणून स्वताला दीड शहाणे समजणारे ' हि समजूत आता रुजून कुजून जुनी झालीये - so तुका म्हणे याबद्दलचे वाद मला तरी फारसे सहन करायला लागले नाहीत.

2) माझ्या कंपनी च नाव - 'Marvell Semiconductors' -
"हि कुठली कंपनी बरं? तुला IBM/Infosys ची offer होती असं म्हणाला होतास ना? काय झालं त्याचं? तिकडं का बर नाही गेलास??" असं जेव्हा चेहऱ्यावर आर्त भाव आणून "कुठे आहेस तू" या प्रश्नाच्या माझ्या उत्तरावर लोक react करायचे तेव्हा खरच a little part of me used to die inside :) यात कुणाचीच काहीच चूक नाही - माझी मात्र पक्की विकेट गेलेली असायची!

3)चंगळवाद
वडा पाव २ चा ५, ५ चा १० आणि १० चा २० झालाय म्हणून कुरकुर काही थांबवली गेलेली नाही - फक्त आता वडा पाव खाण्याचं प्रमाण मात्र कमी झालंय . high-earning-high-spending-mall संस्कृती वगैरे वगैरे वादात मला पडायचंच नाहीये - किंवा rather ते नंतर कधीतरी - पण एक गोष्ट मात्र खरी - कि स्वत कमावलेले पैसे खर्च करताना जे भारी वाटतं ते शब्दात नाही सांगता येणार -
पैसे चांगल्या पद्धतीने, कसे खर्च करायचे हे खूप कमी लोकांना कळत, मान्य!
आहेत म्हणून फक्त दिसेल त्यावर पैसे खर्च करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे, मान्य!
पण हि चंगळवादाची definition च नाही मुळी - हि तर नुसती 'चंगळ' झाली :P
चंगळवाद हा peer pressure नि येतो - "shit अजून आपल्याला Basho's कुठं हे माहिती नाही" , "अजून चांदणी चौकातल्या Apache मध्ये जायचं राहिलंय" - "आयला अजून Casanova मध्ये नाही गेलेलो" असं जेव्हा अगदी 'आतून' वाटायला लागत ना तेव्हा वेळ आलेली असते चंगळवाद join करण्याची! चंगळवाद हि म्हणून तर एक चळवळ आहे - joint effort - distributed system - असो चंगळवादाचा detailed manifesto नंतर कधीतरी :-P

4)Recession -
एखादं अवजड दार खालती पडून बंद होण्याच्या just आधी खालच्या फटीतून - निसटून वाचलेली batch - म्हणजे माझी batch! आम्ही s/w industry मध्ये पाऊल ठेवलं ना ठेवलं तोच recession चालू झालं - timing पण अगदी सुरेख जुळून आलं तसं आमचं! ३-४ महिन्यातच काहींचे जॉब गेले - ऑफिस मधल्या सगळ्या freebies बंद झाल्या - आणि नाही म्हटलं तरी एक tension च फिलिंग आलेलं असायचं - पण जाऊ दे - कदाचित हा पण एक lesson च होता - सुरुवातीलाच या पेशाचा भेसूर चेहरा बघायला मिळाला, असो :)

५) रोजच्या बोलण्यामध्ये आलेलं sophistication - म्हणजे असं निदान मला तरी वाटतंय -
'mail-a-mail-i' मध्ये येणारे references बाजूला ठेवले तरी बोलण्यामध्ये सुद्धा Thank you - sorry - thanks - वगैरे म्हणायचं प्रमाण वाढलंय - परवा तर चक्क मी movies आणि serials कॉपी करून घेतल्या नंतर एका मित्राला thank you म्हणालो - त्याला पण जरा चुकल्या चुकल्या सारखं झालं असेल :-P

तर म्हणता म्हणता एक वर्ष तरी survive झालंय बघू पुढे काय होतं ते - पुढचं पुढे :)

-----------
वेदांग नि seriously मनावर घेऊन ह्या Post च English मध्ये भन्नाट translation केलेलं आहे - इथे .
धन्यवाद वेदांग!

14 comments:

V R said...

nice post...
kharach chhan lihalay... :)

अभिजीत said...

दर्जेदार ! आपल्या सगळ्य़ांच्या मनातील भावना अगदी नेमकेपणाने व्यक्त केल्या आहेस.

Unknown said...

Jamlela ahe. Anand jhala vachun... Jai Changalvaad

Vedang said...

very well written salil! i agree completely with abhijit.

Ameya said...

भीड़ रे ! सुरेख लिहिल आहेस !

Jitesh Shah said...

aaila!
me kasa miss kela he... vedang chya blog var vachla tehva kalla!

bhaaari lihilay!!! awesome!

Ashish said...

chhan lihile ahes re!

ANAGHA said...

Very well written... Came here from Vedang's blog.. Pan Marathi touch chi majjach veglli... (No offence Vedang :P)

Vedang said...

@anagha
none taken! भारीच लिहिलय म्हणुन तर translate केल!

Amit said...

nice one dude.. n thnks to vedang for redirecting me here :)

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...

changalvaad aani aaple life yavar uttam lihle aahes