Tuesday, May 1, 2012

Story

चौथा call होता आता हा. आणि हि रिंग तर साली अजून संपतच नव्हती, प्रत्येक सेकंद हा नुसता एका भयाण क्षणासारखा, स्वतःच अस्तित्व अगदी ठामपणे गाजवणारा आणि मगच पुढे जाणारा.... आधीच मनाचा निश्चय डळमळीत ,त्यात हे एकावर एक येणारे नुसते calls. नक्कीच पोचली असेल एव्हाना ती तिकडे. नेहमीसारखी  स्वताच्याच जगात, सराईतासारखी नुसती एक नजर फिरवली असेल - तिच्या भाषेत म्हणायचं तर सगळ्या 'crowd' वरून, आणि मग कुठेच दिसत नाही म्हणून एकदा goggle काढून घड्याळ  पाहिलं असेल, एकदा सुस्कारा टाकून मान हलवली असेल..... आणि मग हा फोन चा शेवटचा पर्याय... 
त्यान ring silent केली. अगदी डोळ्यासमोर घडत असलेल्या गोष्टीकडे सर्रास कानाडोळा करायला सोप जाव
म्हणून बनवलेली सोय आहे हे ring silent करता येण्याच feature म्हणजे. तिचच वाक्य. असच कधीतरी तावातावाने म्हटलेल. "मी ज्या गोष्टी चिडून बोलते त्याच लक्षात राहतात तुझ्या!" हे वाक्य सुद्धा कधीतरी चिडूनच म्हटलेल असल्याने त्याच्या लक्षात राहिलंय! तो स्वतशीच हसला.  कदाचित अशा हसण्यालाच 'कुत्चीत' हास्य म्हणत असावेत.

"25 minutes उशीर!??" उंचावलेल्या भुवया, कपाळावर आठ्या, रोखलेले डोळे आणि ओठांचा चंबू. अजिबात बदललेली नाहीये पोरगी. 
"Hhhmm... हो. Sorry."
"एवढ जीवावर येतंय तर म्हणू नकोस Sorry."
"ते तिकडच table आहे - बसू तिकडे" 
"आणि इतका अचरटा सारखा उशीर का केलास? मी तुझी वाट  पहात  मुर्खासारखी थांबते का नाही ते बघायच होत का?"
"हो" 
"चौथ्या वाक्यातच सरळ उत्तर आणि मुद्द्याला हात? वा वा, प्रगती आहे! 5 minutes ची प्रस्तावना आणि 10 minutes च रडगाणं याला तू चाट दिलीस हे एक बर केलास बुवा."

तो काहीच बोलला नाही. तिला चिडचिड करण्यासाठी तिची space लागते हे त्याला अनुभवांती ठाऊक होत. त्यान 2 चहा मागवले आणि हात table वर ठेवून तिच्याकडे पाहू लागला. ती अजूनही फुरफुरत होती. "useless" वगैरे तत्सम शब्द त्याच्या कानी पडले. college मध्ये असताना आणि नंतर सुद्धा त्याला अनेकांनी "तुमच्या दोघांच काही लफड वगैरे आहे का" अस अनेकदा विचारल असेल.   अशा प्रश्नाचं उत्तर देण्यानी कधीच काही हशील होत नाही. विचारणाऱ्या माणसाच मत तुमच्या उत्तरांनी बदलणार तर नसतच - उलट ते अजून धृढच होणार असत - तुम्ही काहीही म्हणा. पण खर सांगायच तर त्याला स्वतःलाच माहिती नव्हत. मैत्रीण? शत्रू? rival? confidant? He had always done his best work with her. त्यांची team unbeatable होती. ते वचावचा भांडायचे. तो तिच्यावर चिडायचा, ती त्याला शिव्या घालायची. तो तिला हाड-हूड करायचा. पण शेवटी काम पूर्ण व्हायच. एका basic courtesy च्या पुढे त्यांना एकमेकांबद्दल काहीच personal माहिती नव्हती. दोघांनीही कधी ती जाणून घ्यायचा प्रयत्न हि केला नव्हता. एक-दोन warm moments नक्कीच share केल्या असतील त्यांनी पण ते तेव्हढपुरतच. सगळे जण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाणार तेव्हा farewell party च्या शेवटी त्यांनी एकदा मिठी मारली होती. अगदी क्षण दोन क्षण ती मिठी सोडूच नये असा विचार त्याच्या मनात येऊन गेला असेल, कदाचित तिने ती मिठी सोडायला एक पाव सेकंद जास्त लावला असेल किंवा कदाचित हा सगळा त्याचा भास च असेल...
"ओ राजे आलाय चहा. घ्या. 6 वर्षांनी भेटतोय आपण. काही बोलणार आहात का नुसत थोबाडाकडे  पाहत बसायचं एकमेकांच्या?"
"काय म्हणतय वैवाहिक जीवन?"
"मस्त! 8 वर्ष झालीत लग्नाला. पोराबाळांची झंझंट नाही. दोघ जण पैसे कमवतोय. We enjoy our work and enjoy each others' company."
"So you are happy?"
"I don't see any reason why I should say no."
"Hhmm... True."
"अरे निदान खोट खोट तरी I am happy for you अस म्हण!"
"मी तस म्हणत नाहीये हे एक indication नाही का?"

तिनी चहाचा cup खाली ठेवला. एक दुखावल गेल्याची भावनेची झालर तिच्या डोळ्यांवर आल्यासारख वाटल त्याला. उगाचच एक आसुरी आनंदाची लहर त्याच्या मस्तकात गेली. आणि लगेचच दुसर्याच क्षणी ती  विरून त्याला  किळस आली स्वताची. काय करतोय तो? तिला दुखावतोय? मुद्दामहून? कशासाठी? कारण राग आलाय त्याला तिचा. पण तो राग नक्की कशाचा आहे? असा काय आहे जे त्याच्याकडे नाहीये? पण तरी काहीतरी खुपतंय. ठसठसतय. झोम्बतय. 
"काय झाल? मला माहितीये कि friends, नवरा-बायको यांना दरवेळी सगळ सांगता येतच नाही. मी नाही म्हणते कि मला तू सांग. पण काही मदत करू शकत असले तर करीन." 
वाक्याच्या शेवटी हळू हळू होत गेलेला तिचा आवाज. ती genuinely बोलत होती. He can always tell. 
"भीती वाटते मला!" 
"भीती वाटते डोळे बंद करायची!" 
"भीती वाटते स्वताच्या विचारांची आणि स्वताच्या मनाबरोबर एकट राहाव लागेल कि काय याची!"
"त्याच्यापेक्षा गर्दीत हरवून झाण सोप! एक नुसता चेहर्याचा ठिपका होण बर! ना आगा ना पिछा!"
"पण अस कोरड होण तर कधी जमतच नाही. कोडगेपणा रक्तातच असायला हवा. नंतर कितीही प्रयत्न केले तरी भिनवता येत नाहीच पुरेसा. आणि मग फक्त ओढताणच होते..."
ती आता सावरून बसली होती. त्याचा असा भांध फुटलेला तिनी कधीच पहिला नव्हता. 
तो आता बोलायचं  थांबला होता. हळू हळू श्वास शांत होत होता. त्याने उगाचच घसा खाकरला. मान झटकल्यासारखी केली.
"Thank You. That helped." त्याचा आवाज वरमल्यासारखा होता. 
"पण मला अजून तू काहीच सांगितला नाहीयेस."
"जे सांगायच होत ते सांगून झाल. घटना, व्यक्ती आणि घडलेल्या घडामोडी मध्ये आणून जे शेवटी  सांगायच होत ते असच काहीतरी असणार होत. उलट ते props आणि details नव्हते हे चांगलच झाल."
तिच्या चेहर्यावर एक all-knowing smile आल. त्याच्या चांगलच ओळखीच आणि राग आणणार. पण आत्ता नाही. 
"You know what - Stop looking for an excuse to blow up your life."
तो एकदम चमकला! जोरात आलेल्या वार्याने पळवून लावलेल्या ढगानंतर निळ्याशार होणार्या आभाळासारख त्याला काहीतरी एकदम वाटल. त्याने डोळे वर केले. ती त्याच्याकडेच बघत होती. शांतपणे. एकटक. जणू ती थांबली होती - तो बोलण्यासाठी.
तिच्या काळ्याभोर डोळ्यात टक लावून मंदपणे हसत तो एकच वाक्य म्हणाला - 
"I am so glad we are not friends."
----------------------------------------------------------------------------------------------------------

1 comment:

Anonymous said...

Nicely written story..
However, frankly I am in confusion about the end...the last sentence. In my opinion, that is the realization he has come up to and happy about the fact that they are not friends.