Saturday, April 10, 2010

Really??

छोट्या छोट्या, अव्यक्त आणि फुटकळ वाटणाऱ्या गोष्टीच कधी कधी उगाचच लक्षात राहतात.........
खरं सांगायचं तर असं काहीच groundbreaking घडलेलं नसतं, त्यांमधून मिळालेला आनंद, किंवा सलणार दुःख हे literally क्षणिक असतं पण तरी सुद्धा अनेक obviously भावना demand करणाऱ्या गोष्टींपेक्षा - काहीतरी अशा seemingly insignificant गोष्टींमुळे 'झालेल्या' भावना(खरं तर इथे 'प्रसवलेल्या' हे क्रियापद जास्त fittt बसेल पण जाऊ दे :-P) - या का बरं एवेढ्या भावतात? कडकडून मिठी मारण्यात तर एक आनंद असेलच - पण नुसते डोळे जरी भिडले तरीसुद्धा जे butterflies येतात ते हि एवढे हवेहवेसे का वाटतात? हसत खिदळत टाळ्या देत मजा करणं औरच आहे - पण ६ महिने फारसा contact नसताना अचानक 'तुझे फोटो पाहिले - भारी वाटलं' हा एकच ओळीचा offliner पण तेव्हढाच जवळचा का बरं वाटतो? कदाचित अव्यक्त राहण्यात पण एक गम्मत असेल - overtly expressive नसणं हाच त्यांचा express करण्याचा एक भाग असेल - मला वाटतं कि expressive असताना आपण भावनांना labels देऊ शकतो - मला आनंद झाला - वाईट वाटलं असं marked distinction करता येत - पण काही भावना अबोल च बऱ्या असतात - आणि त्यांचं ते अबोल असणं हेच सुंदर असतं

कितीदा तरी होतं असं माझं, कुणीतरी काहीतरी बातमी सांगतं आणि मग त्यावर एका socially accepted way नि react करणं अपेक्षित असतं, म्हणजे अरे हि आनंदाची बातमी आहे, आनंद दाखवला पाहिजे , दुखः दिसलं पाहिजे, पण कधी कधी तसं जमतच नाही, कारण काय वाटतंय, नक्की काय भावना आत्ता मनात आलीये, ते either कळलेल तरी नसतं or कळून ती दाखवायला मन धजावत नसतं. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे त्याची तीव्रता; त्या संवेदनेची 'level' म्हणू आपण; अजून अपेक्षित intensity ला पोचलेली नसते - ज्याला not necessarily फक्त वेळेचीच गरज असते पण कधी कधी एखाद्या घटनेचीपण.Again, 99% of the times आपण आपोआप बरोबर react करतोच ,केलं जातंच, पण कधी कधी जमत नाही हे हि तेव्हढंच खरं. मन नुसतंच कोरडं राहत. अर्थात हे सगळं त्याच वेळेला लागू होतं जेव्हा सांगणाऱ्याला, ऐकणाऱ्या कडून जी भावना invoke करायची असते तीच ऐकणाऱ्याकडून खरच invoke होते or invoke होण्याची शक्यता तरी जास्त असते. उदाहरणार्थ "हारल रे manU" असं मला कुणी सांगितलं expecting कि मीहि त्याच्या दुख्हात सहभागी होणार तर चुकलास मित्रा, पण जेव्हा सगळं काही नीट होऊन मनानी शहाण्यासारखं वागणं, react करणं अपेक्षित असतं पण तरीही ते होत नाही, तेव्हा मग ते हास्य 'हास्य' राहत नाही, काहीतरी उगाचच भेसूर होऊन जातं, चेहरा आंबट होऊन जातो आणि वाईटातली वाईट गोष्ट म्हणजे ते आपल आपल्यालाच फक्त दिसत असतं.......

असो, assuming कि हा प्रत्येकाच्या स्वभावाचा एक अविभाज्य घटक आहे, let me get back to what i wanted to say originally. जर आपण अश्या "बटबटीत"(honestly for the lack of a better word - साली मातृभाषेची शब्दसंपत्ती इतकी वरवरची आणि वीर GRE देतात!) घटनांना, गोष्टींना इतकं महत्व देतो, or rather accepted interaction norms नुसार, चाकोरीबाहेर जाऊन "हे असं बरोबर नाही दिसणार च्यायला" म्हणून त्यांना 'अवाजवी' - निदान त्या क्षणापुरतं तरी ते नक्की 'अवाजवी'च असतं - भाव देतो, तर मग लहानश्या, क्षणिक, irrelevant, childish, "हु त्यात काय एवढ" वाटणाऱ्या गोष्टींना थोडसं महत्व दिलं तर त्यात काय चुकलं? सगळ्याच गोष्टींना आनंद, दुखः अशा crude generalizations मध्ये का बसवायचं? अर्थात या गोष्टी प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या मानसिकता, संवेदनशीलता, एकूणच व्यक्तिमत्व कसं आहे - थोडक्यात भावना feel करण्याची त्या व्यक्तीची index किती आहे - यानुसार त्यांचं स्वरूप, त्यांचा seriousness - from others' point of view of course - बदलणार पण तरी सुद्धा त्या व्यक्तीपुरततरी त्याच महत्व तिळमात्र कमी नाही होत. आता गेल्या काही महिन्यातल्याच अशा काही गोष्टी कि ज्या बहुतेक 'पांचट' या category मध्ये बसतील, stupid म्हणून हिणवल्या जातील इतरांकडून पण असं होणं हीच त्यांच्या relevant असण्याची पावती असेल :-P
अशाच काही सटरफटर गोष्टी - आयला माझा blog आहे, मी काहीही idiotic पण टाकीन!

1)आपण काहीच करत नाहीरे, काहीतरी करायला पाहिजे, कुठतरी जायला पाहिजे अशी तावातावानी चर्चा होऊन, त्याचा शेवट चला भेळ खाऊ/कॉफी पिऊ/जेवायला जाऊ/cadb खाऊ याने होणं आणि यातलं काहीतरी केल्यावर खरच चांगलं वाटणं!
2)एखादं गाणं अगदी enjoy करत ऐकत असताना - एखादं कडव संपलं कि जो momentary lull येतो त्यात गाणं संपलंय असं वाटण पण तेव्हढ्यात अजून राहिलेलं ते शेवटचं कडव चालू होणं आणि उगाचच चेहऱ्यावर एक smile येणं.... :-)
3)एक वाईट, खोल, घाणेरडा खड्डा, bike वेगात, break दाबण शक्य नाहीये, खूप गचका बसणारे, गाडीची वाट लागू शकते जाऊ दे च्यायला, घाला तशीच - आणि त्याच वेगामुळे असुदे किंवा उगाचच extra मानसिक तयारी केल्यामुळे असुदे - bike अशी हलकीच cruise होत गेल्यासारखी वाटणं.............
4)buzz च्या edit profile मध्ये - "Something I can't find using Google" च्या example options मध्ये paradise,love,atlantis याबरोबरच 'Oceanic 815' पण दिसण :-P

असो.
बाकी काहीही नाही तरी 'वायफळ बडबड करणे' हा purpose तरी या post नि नक्की complete केला असेल!

PS: I hope the symbolism in the last line is obvious :-)

Wednesday, August 12, 2009

वर्षांतर

[Updated]

"एक वर्ष झालं कि घोड्या!" शेवटच्या exam नंतर गोव्याला जाऊन ढोसलेल्या दारूचा वास जातो न जातो तोच job चालू झाला होता आणि आज, अक्षरशः बघता बघता एक वर्ष उलटलं कि! चार quarters, एक performance review, बारा महिने आणि ३६५ दिवस जगुन पण झाले च्यायला , मी officially म्हातारा पण झालो :P

Techinically सांगायचं तर २-३ आठवड्यापूर्वीच माझा हा वाला 'वाढदिवस' झाला - पण नेहमीप्रमाणे त्या दिवशी काहीच 'वाढ' झाल्यासारखं वाटलं नव्हतं - ते म्हणा कधीच वाटत नाही - पण काहीतरी विचित्र, वेगळ अस feeling पण नव्हतं - ते असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींमधूनच कळत जातं - for example - friendship day :) तसं बघायला गेलं तर या वेळेला पण मागच्या वेळ सारखाच आणि मागच्या वेळ एवेढाच राडा आणि गोंधळ घातला पण मुद्दा असा कि मागच्या वर्षी आणि या वर्षी मी ज्या लोकांबरोबर होतो - ते २ sets अक्षरशः mutually exclusive होते - अर्थात एक दोन अपवाद सोडून ! आणि मग वाटून गेलं खरच केवढं बदललय सगळं, आतून बाहेतून! Stress points, pressure चे मुद्दे , दिनक्रम , body clock अगदी अथपासून इथिपर्यंत सगळं :-)

तसं बघायला गेलं तर कुठलाच बदल हा चांगला किंवा वाईट नसतो - तो फक्त अपरिहार्य असतो! आणि कितीही तयारी केली , कितीही मानसिक समजूत घालून ठेवली तरीसुद्धा कोण कुठल्या change ला कसा, कितपत adapt होईल हे काळच ठरवतो. लोकं म्हणतात कि बदल त्यांनाच मानवतो जे बदलायला तयार असतात - but i don't think its about being the fittest to survive the change, its about surviving the change to be the fittest. हे म्हणजे लाटा उसळणाऱ्या समुद्रात उभं राहण्यासारखं आहे. आपण एकाच जागी राहायचा ठरवलं तर आपल्याच नाका-तोंडात पाणी जाणार आपलीच चिडचिड होणार आणि main म्हणजे आपल्यालाच त्यांची मजा नाही अनुभवता येणार! त्याउलट जर आपण क्षणभर रोवलेले पाय सोडून तरंगायला तयार असलो, तर लाटांच्या लयीत वर खाली होणं काही फारसं अवगढ नसतं :) लाटा तर relentlessly येतंच राहणारेत - त्या थांबवण्याची क्षमता आपल्याकडे कधीच नव्हती - त्या आपल्यावर आदळतच राहणारेत - त्यांना आदळू द्यायचा का नाही हा option सुद्धा आपल्याकडे कधी नव्हताच - कधीच नसणारे....असो. :)

आता नवीन जॉब, नवीन माणसं, नवीन काम, नवीन जग - या सगळ्या tangible गोष्टी झाल्या - पण याचबरोबर खूप साऱ्या intangible गोष्टी पण आहेत ज्यांच्यामुळे i had a real blast this year!! अर्थात सगळ्याच, सगळ्यांना सांगण्यासारख्या नाहीत - पण at least काही factors तरी नक्की deserve करतात :) ->

1)"s/w मध्ये जॉब आहे" हे सांगितल्यावर उंचावणाऱ्या भुवया, अगदी थोडेसेच पण तरीही noticeable असे मिचमिचे झालेले डोळे , "हो का?" "बर बर" "छान हो" वगैरे घिसेपिटे responses आणि "हा पण त्यांच्या team मध्ये गेलेला दिसतोय" असं बोलणार ते कुत्सित हास्य - विशेषतः काका-काकू वयोगटातल्या लोकांचं - या सगळ्याची पहिल्यांदा सवय करून घ्यावी लागली :) तसं बघायचं तर मी s/w engineersच्या सेकण्ड generation मधला आहे असं म्हणायला हरकत नाही - त्यामुळे ' s/w चे लोक म्हणजे जास्त पगार मिळणारे आणि म्हणून स्वताला दीड शहाणे समजणारे ' हि समजूत आता रुजून कुजून जुनी झालीये - so तुका म्हणे याबद्दलचे वाद मला तरी फारसे सहन करायला लागले नाहीत.

2) माझ्या कंपनी च नाव - 'Marvell Semiconductors' -
"हि कुठली कंपनी बरं? तुला IBM/Infosys ची offer होती असं म्हणाला होतास ना? काय झालं त्याचं? तिकडं का बर नाही गेलास??" असं जेव्हा चेहऱ्यावर आर्त भाव आणून "कुठे आहेस तू" या प्रश्नाच्या माझ्या उत्तरावर लोक react करायचे तेव्हा खरच a little part of me used to die inside :) यात कुणाचीच काहीच चूक नाही - माझी मात्र पक्की विकेट गेलेली असायची!

3)चंगळवाद
वडा पाव २ चा ५, ५ चा १० आणि १० चा २० झालाय म्हणून कुरकुर काही थांबवली गेलेली नाही - फक्त आता वडा पाव खाण्याचं प्रमाण मात्र कमी झालंय . high-earning-high-spending-mall संस्कृती वगैरे वगैरे वादात मला पडायचंच नाहीये - किंवा rather ते नंतर कधीतरी - पण एक गोष्ट मात्र खरी - कि स्वत कमावलेले पैसे खर्च करताना जे भारी वाटतं ते शब्दात नाही सांगता येणार -
पैसे चांगल्या पद्धतीने, कसे खर्च करायचे हे खूप कमी लोकांना कळत, मान्य!
आहेत म्हणून फक्त दिसेल त्यावर पैसे खर्च करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे, मान्य!
पण हि चंगळवादाची definition च नाही मुळी - हि तर नुसती 'चंगळ' झाली :P
चंगळवाद हा peer pressure नि येतो - "shit अजून आपल्याला Basho's कुठं हे माहिती नाही" , "अजून चांदणी चौकातल्या Apache मध्ये जायचं राहिलंय" - "आयला अजून Casanova मध्ये नाही गेलेलो" असं जेव्हा अगदी 'आतून' वाटायला लागत ना तेव्हा वेळ आलेली असते चंगळवाद join करण्याची! चंगळवाद हि म्हणून तर एक चळवळ आहे - joint effort - distributed system - असो चंगळवादाचा detailed manifesto नंतर कधीतरी :-P

4)Recession -
एखादं अवजड दार खालती पडून बंद होण्याच्या just आधी खालच्या फटीतून - निसटून वाचलेली batch - म्हणजे माझी batch! आम्ही s/w industry मध्ये पाऊल ठेवलं ना ठेवलं तोच recession चालू झालं - timing पण अगदी सुरेख जुळून आलं तसं आमचं! ३-४ महिन्यातच काहींचे जॉब गेले - ऑफिस मधल्या सगळ्या freebies बंद झाल्या - आणि नाही म्हटलं तरी एक tension च फिलिंग आलेलं असायचं - पण जाऊ दे - कदाचित हा पण एक lesson च होता - सुरुवातीलाच या पेशाचा भेसूर चेहरा बघायला मिळाला, असो :)

५) रोजच्या बोलण्यामध्ये आलेलं sophistication - म्हणजे असं निदान मला तरी वाटतंय -
'mail-a-mail-i' मध्ये येणारे references बाजूला ठेवले तरी बोलण्यामध्ये सुद्धा Thank you - sorry - thanks - वगैरे म्हणायचं प्रमाण वाढलंय - परवा तर चक्क मी movies आणि serials कॉपी करून घेतल्या नंतर एका मित्राला thank you म्हणालो - त्याला पण जरा चुकल्या चुकल्या सारखं झालं असेल :-P

तर म्हणता म्हणता एक वर्ष तरी survive झालंय बघू पुढे काय होतं ते - पुढचं पुढे :)

-----------
वेदांग नि seriously मनावर घेऊन ह्या Post च English मध्ये भन्नाट translation केलेलं आहे - इथे .
धन्यवाद वेदांग!

Sunday, June 21, 2009

नाटकीपणा - भाग एक

[Long Post]

खर सांगायच तर नाटकातल मला ओ-की-ठो कळत नाही। कॉलेज च्या काळात पुरुषोत्तम, फिरोदियाशी आपला सम्बन्ध फक्त जोरजोरात cheering करायला जाणे, घसा फोडून बोम्बलायला मिळणे आणि बाकीच्या colleges च्या पोरी बघायला जाणे एवढाच होता. आम्ही आपले बोरू-बहाद्दर - मारे हे पुस्तक वाचलय, ती कथा वाचलिये अस सांगत फिरणारे - असो. तर मुद्दा असा की भले आपल्याला एखाद्या विशयातल टिचभर जरी कळत असल तरी मनसोक्त, कुणाचीही तमा न बाळगता ते ज्ञान पाजळायला blog ही सोप्पी पळवाट आहे - नव्हे गेल्या काही महिन्यात असे हजारो self-proclaimed blogs वाचून हे गरजेचच आहे हे मला पटलय. अहो orkut, twitter एवढच blogger वरचा अकाउंट असण महत्वाच आहे अस म्हणतात लोक - तर मग अशाच एका blogger च वाक्य - त्याच्या परवानगीशिवाय ढापून मी वापरतो - ' अगदी पुण्यात बटाटे कुठे चांगले मिळतात तिथपासून ते Estonia च्या अर्थव्यवस्थेवर s/w industry recession चे उमटलेले पडसाद' यावर मी छातीठोकपणे मत मांडूनच राहणार! आणि म्हणूनच जरी भले माझे ५-६ मित्रच हा ब्लॉग वाचत असले ( च्यायला orkut आणि facebook वर अधाशासारखे friends add करून काही उपयोग होत नाही सांगतो ) तरी मारे greatBong वगैरे तत्सम कसलेल्या bloggers सारखं मी वरती 'Long Post' अस चावटपणे लिहिलंय हे सूज्ञांच्या लक्षात आल असेलच :-P

हा तर मुद्द्याची बात - नाटकं. गेल्या ३ आठवड्यांच्या कालावधीत मी पक्की '५' नाटकं बघितली. आता प्रायोगिक, experimental, artistic, aesthetic, भन्नाट, तुफान, layyyy bhaaarrrii, फोडलंय, एक वेगळीच संवेदनशीलता लागते अशी नाटकं बघायला, वगैरे सगळी विशेषणं लागू होतील अशी नाटक होती ती. खरं सांगायचं तर " झेपत असेल तर बघा नाहीतर उगाच नंतर कळलं नाही म्हणून शिव्या घालत रडत बसू नका " हा सुप्त encrypted अर्थ या सगळ्या विशेषणा मागे दडलाय हे मला अनुभवांती कळलंय आता. तसं बघायचं तर अशा नाटकांना 'spoilers' असा काही प्रकार नसतो - त्यामुळे तुम्ही हि नाटकं बघणार असाल किंवा बघणार नसाल, बघितली असतील किंवा नसतील, माझ्या विशेष टिप्पण्या (म्हणजे अचरटपणा) वाचून काही फरक पडेल असं मला वाटत नाही. Again, मला साहित्यिक बारकावे, theatrical भावभावना, artistic संवेदनशीलता वगैरे कळत नाही. मी आपला एक पोट सुटलेला, केस विरळ होत चाललेला, चंगळवादी संस्कृतीचा पामर s/w engineer आहे - अजाण अबोध बालक - आणि म्हणून हि बडबड सर्वतोपरी 'उथळ' आहे हे ओघानी आलच :-)

१. "आ जा मेरी गाडी में बैठ जा"
मी सुरुवातीला ठरवलं होता कि २-३ वाक्यात आधी नाटकाची theme सांगायची आणि मग पुढे जायचं पण देवाशप्पथ खरं सांगतो खोटं बोलत नाही - मला हे नाटक कशाबद्दल आहे, काय आहे, का आहे, purpose काय, जे घडतंय ते का घडतंय, कस, कुठे, कधी, का काहीच कळलं नाही. स्त्री-पुरुषांमधले संबंध - वेगवेगळ्या वयोगटातले , वेगवेगळ्या वयोगटातल्यांचे ; कालानुपरत्वे येणारा relationship मधला शीळेपणा; एका मर्यादेबाहेर एकमेकांना ''granted for' धरले जाणे; पोटतिडीकीने, तिरस्काराने दुसर्याला लागेल असे बोलणे आणि नुसते बोलणे नाही तर ते अक्षरशः ओरबाडून सांगणे; प्रेमात पडण्याची अधीरता, प्रेमात पडल्या नंतरची स्वताच स्वताची केलेली ससेहोलपट या आणि अशा अनेक भावनांचा नुसता भडीमार होतो. २ नच पात्र आहेत पण तरीही खूप loud, बटबटीत वाटत. पण त्याला कुठेच कथेचा एकसंधपणा नाही आणि अशी काहीच theme नसल्यानी नको तिकडे हशा मिळतो, हिरो नि shirt काढल्यावर शिट्ट्या मारणे वगैरे अचकट प्रकार चालू होतात आणि माणूस bore होतो. त्यात दीर्घांक. १२० minutes सलग.मला almost झोप लागली होती पण मित्रानी अगदी हातवारे वगैरे करून उठवलं म्हणून. त्यात हे कुठल्यातरी Russian का greek का egyptian कथेच नाट्यरूपांतर आहे - मला खरच लक्षात ठेवावं वाटलं नाही - कारण उगाच नंतर शोधून ती कथा वाचालीये वगैरे भानगडच नको म्हणल :)

2. "तू"
आत्तापर्यंत बरीच पारितोषिक मिळवलेलं आणि सर्वार्थानं नावलौकिक वगैरे असलेलं हे नाटक. विषय अर्थात प्रेम आणि लिहिलंय एका कवयित्री नि. कवीला कुठल्या डोळ्यांनी, कुठल्या चष्म्यातून, कुठल्या आवरणातून जग दिसत कोण जाणे - तासंतास बडबड केली तरी देखील शब्दात मांडता येणार नाहीत अशा भावना ज्यांना दहा ओळीत सुबकपणे बंदिस्त करता येतात त्यांना माझं seriously दंडवत. यात एक साधारण ५० कविता आहेत - गद्य स्वरुपात - अगदी slightly connected stories च्या format मध्ये गुंफलेल्या , arabic किंवा persian backdrop असलेल्या. नाटक सुरु होतं एका प्रियकर प्रेयसी च्या उत्कट प्रवेशापासून. नंतर खूप खूप प्रेम, विरह, दुख, मदिरा, बेधुन्दी, बेहोशी, स्वताला झोकून देणं, हरवून जाणं, जगाच्या आणि जीवाच्या अंतापर्यंत मी तुला शोधेन, मी तुझ्यासाठी थांबेन वगैरे सगळं होतं. कलाकार बरेच आहेत, सगळेच चांगले कसलेले, energetic आहेत. नाटक खिळवून नक्की ठेवतं पण मला असं कुठेतरी वाटलं कि हे लोकं कवितेचं interpretation आपल्यावर enforce करतायत - कविते मधली भावना त्यांच्या अभिनयानी नक्कीच जास्त 'ग्राफिक' स्वरुपात बाहेर येते - पण मग 'कविता भावली' हे जे feeling प्रत्येकाला येत कधी न कधी तरी एखादी कविता वाचल्यावर - जे प्रत्येकाचं वेगळं असतं, unique असतं आणि ते त्याच्या मानसिकतेशी जोडलेलं असतं - तेच कुठे तरी हरवून गेलं असं वाटतं.

असो आज एवढंच 'उंटावरून शेळ्या हकण'....... बाकिच नंतर

क्रमशः


Saturday, October 18, 2008

सहजच

"पिछले सात दिनों में मैंने हे खोया...." ,
नाही नाही नको नको बोर जालय आता हे song , गाड़ी तल्या ४ पैकी तिघांच अस मत असल्यामुळे अणि भारतात लोकशाही असल्याने (म्हणजे थोडक्यात ती गाड़ी माजी नसल्याने) मला रेडियो चा channel change करावाच लागला तेवढ्यात एक वाक्य आलच " आयला एवढ्या सगळ्या गोष्टी या man नि एका week मध्ये हरवल्या - काय करत तरी काय होता" "अरे हरवल्या असतील आधीच कधीतरी - पण गूम आहेत हे समजल मागच्याच week मध्ये ...." प्रत्येक सॉफ्टवेर इंजिनियर ला आपण २४ तास १२ महीने logically विचार केलाच पाहिजे अस मनापासून वाटत जस रिक्शा वाल्यांना मगरूरी अणि पोलिसांना बेफिकिरी दाखवण्याची नैतिक जबाबदारी आहे अस वाटत त्यातलाच हा प्रकार. "आवरा!! " गाडीत आवरा म्हणायचा पेटंट माझ्याकडे आहे, "मुर्ख आहात तुम्ही मुलांनो, song चांगला आहे ना, ईइका आणि सोडून दया , आणि आत्ता नाही ते पण " मुली टोमणा मारण्याची एकही संधि वाया जाऊ देत नाहीत याचा हाअनखिन एक प्रत्यय अल्यानंटर, मी विचार केला च्यायला अवघ्या दोन वीक्स पूर्वी ऑफिस मध्ये आठ आठ तास ही गाणी एइक्नारे आम्ही लगेच बोर काय जालों....., असो, तर आता maaza निषेध व्यक्त करण्यासाठी मी मोबाइलमधला "जितियें अमुक अमुक" वगैरे तत्सम जहिरात्बाज़ मेसेज फुल आव आणून पर्सनल मेसेज असल्यासारखा वाचू लागलो. आता ही ट्रिक पण जुनी जालिये पण अजुनही प्रूवन जालिम आहे :-) "के डोला रे डोला रे डोला ....." कुणीच विरोध न केल्यामुले silence is acceptance नुसार मी Radio-"DJ" गिरी बंद केलि अणि खिडकितुनबाहेर बघू लागलो, नाउ साडे नाऊ ची वेल त्यात range hills चा रस्ता, आजुबाजुला हिरवगार अणि traffic नाही.....प्लस friday night. तसही एकुणच शुक्रवारी रात्रि adrenalin level जरा वाढलेली असतेच ..........
कॉलेज नि LC दिला परवा , एका मित्राचा dilogue जालाच 'आता कसा कॉलेज नि डिवोर्स दिल्यासारखा वाटतयमहिना थोडेसे दया आता फक्त म्हनाव कॉलेज ला की जालच :-P ' हसाव का रडाव या वाक्यावर हे न समजल्यामुलेसगळे हसलेच होते .....friends च्या catagories मध्ये आता 'दोस्त' , 'कॉलेज ग्रुप' ,'शालेतला ग्रुप' , 'girlfriends' (मी optimistic आहे, या catagory मध्ये कोणी नसल तरी अशी catagory सुद्धा ठेवू नए हा कुठला न्याय :-P ), 'we are just good friends' (निदान यात तरी कोणीतरी पाहिजे - पण इयत्ता आठवी पासून एकच उत्तर आहे - work in progress :-) ) या नेहमीच्या सोडून colleagues अशी नवीन "टीम" तयार zaliye :-P आपल्याला पाच दिवस फुकट gilayala मिळणार यातल अपरूप संपलय, "मेरा ऑफिस 16km दूर है " या वाक्यातला तर दमच गेलाय सगला.....माणुस किती लवकर adapt होतो.... weekend ला दिवसभर zopa काढण्याची सवय शरीराला व्ह्यायला एकच weekend पुरला A।C। हा maza जन्मसिद्थ हक्क आहे हे पक्क zala। headphones, cell, cell cha charger, laptop,tyacha charger,LAN wires अस आयुष्य 'wiry' zalay पण शरीर मात्र गोलाई च्या रस्त्यानी चाललय :P
"काय रे खयालोमें डूबा एकदम," बरोबर आहे, song संपून १० सेकंड्स होउन गेले तरी मी अजुन channel change केला नव्हता (ही माजी खासियत आहे) सगल्या चैनल्स वर हिमेशभाई अपला "Karzzz" fedat आहे हे लक्षातआल, SFM वाले बिचारे "नवनिर्माण" mule दर तीन songs मध्ये एक तरी मराठी लाव्तातच पण ती बहुतेक गाणी अगम्य असतात म्हणुन ते पण गेल, शेवटी Sindbad the Sailor कुठेतरी सापडल "दुसरीकडे कुठेच काही नाहीये सो......" मी मिस्किलपणे (obviously) , एक सार्वजनिक उसासा......and we Rocked on..........

Sunday, June 22, 2008

Dilemma

I had always been a great ' एसाप्नीती ' fan - you know the little - 100 or so - word stories which aim at teaching something 'worthwhile' and 'teach lessons of life' and blah blah.... well neway i used to find the stories pretty amusing & without any forwarded emails back then where else would one find short & sweet way to pass time? So the thing is, yesterday, during 'the purge' of my room i came across the book and there was one story, heavily titled 'existential dilemma' (don't even ask what its marathi counterpart - that is the actual title was, i conveniently ignored it ;-) ) So here's the story -

A man is running hard to escape a hungry tiger. He tumbles in panic and rolls off a valley. He is falling to what promises to be a certain death in the gorge below, when he just manages to clutch at a small tree that is growing on the rock face( see even 'original' hindi films have their climaxes copied :-P ). He hangs there for dear life. The choice is a bleak one. Above him is a hungry tiger and below him is a deep gorge. There is death on both sides. Just then, the dangling man’s eyes fall upon an 'abandoned' beehive that is a few feet above the tree that he is frantically hanging on to. There is honey dripping from the beehive. The man shuts his eyes and puts his tongue out to catch the sweet honey. It is his moment of fleeting bliss!

The story ends here! Wow, humans are a contemptible lot, damn it, at least Essop definitely was!

Well ,these days I have lots of time to kill, so you know why not learn something about 'existence' and all , I think there are two basic explanations, pretty obvious ones -

(1) Here is this man facing a certain death and, even then, all he can think of is petty satisfaction of his senses. The story tries to show what trivial levels men can sink to even in the face of worthy challenges.

(2)The other explanation is that the human condition is hopeless anyway. We are caught between the tiger and the gorge. It is the drops of honey that make our lives worth living( full SRK sentiments :-P ).

I favour the second analysis,obviously, though I worry that the first one is correct and I am merely rationalizing - something that that we all do - something which sounds better than compromising.

Also,while imagining the situation I found myself looking ridiculous, you know head extended, mouth open, eyes shut, waiting for honey to fall.Won't it be easy to just let go?